महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद

एकविसाव्या शतकातील समाज हा मागील शतकापेक्षा वेगळा आहे. या शतकातील समाजाचे प्रश्‍नही भिन्न आहेत व ते सोडविण्याच्या पद्धती आणि तंत्रेही वेगळी आहेत.या समाजातील प्रश्‍न, त्यांचे स्वरूप आणि व्यापकताही निराळी आहे, तसेच त्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याच्या पद्धतीही कालानुरूप बदलत आहेत. आपले आपल्या समजाचे प्रश्‍न सोडविण्याचा एक मार्ग म्हणजे संघटना निर्माण करणे व तो वाढविणे आज अनेक शिक्षक संघटना आपल्या स्वार्थासाठी महाराष्ट्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर प्रत्येक क्षेत्रात आपल्या लाभासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना आपल्याला दिसून येतात.अनेक संघटना आपापल्या सभासदांच्या हितासाठी काम करताना दिसून येतात, प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात हे संघटनांचे स्वरूप खूपच वेगवान झाले आहे. आता प्रत्येक वेळी प्रत्येक सदस्याने एकत्र येऊन शक्ती प्रदर्शन करण्याची गरज उरलेली नाही. म्हणूनच आधुनिक काळातील या संघटना अधिक विधायक होण्याची गरज निर्माण झाली आहे.सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून संघटना प्रक्रीया बदलत आहे. ज्ञानाचे व माहितीचे आदान प्रदान वेगवान झाल्याने या नेटवर्किंगमधील प्रत्येकाचे सामर्थ्य व सक्षमता वाढत आहे. योग्य नेतृत्व, निष्ठावंत अनुयायी आणि सामाजिक उन्नतीचे ध्येय असणारी संघटना हा राष्ट्रनिर्मितीचा भक्कम पाया आहे. मात्र अशा संघटना ज्या तत्त्वावर निर्माण होतात व दीर्घकाळ टिकतात अशा संघटन शक्तीच्या तत्त्वांचा विचार व अवलंब केल्याशिवाय अशा संघटना निर्माण होणे व टिकणे शक्‍य नाही. संघटना या संकल्पनेची व्याख्या करताना , सं + घटना = चांगली घटना. अशी चांगली घटना तीन शाश्‍वत मूल्यांवर उभी राहायला हवी ती म्हणजे सत्य, एकी आणि नम्रता संघटना सामर्थ्य वाढविण्याचा विचार करताना घटक, संघटक आणि संघटना असा विस्तार मांडला आहे. यातच चंद्रपुर जिल्ह्यातील कणखर नेत्रुत्व श्री.प्रकाश चुनारकर यांच्या सारखा नेता व अनेक सदस्य यांचा संबंधही आला आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद या संघटनेमध्ये असणारा प्रत्येक घटक म्हणजे अनुयायी, सहकारी, सभासद हा उत्कृष्ट संघटक व निष्ठावान आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद संघटमेमध्ये दुसरा एक अर्थ आहे. तो म्हणजे घटना हा संघटनेचा आत्मा आहे. ती उच्च मूल्यांवर आणि व्यापक हितावर आधारित आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद संघटना उभी करण्यासाठी श्री.प्रकाश चुनारकर यांचे सक्षम नेत्रुत्व व अपार मेहनत कष्ट आहेत.ते महाराष्ट्रातील शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविण्याचे कार्य करित आहेत.
निःस्वार्थ हे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद संघटनेचे पहिले पथ्य आहे. संघटनेत एका व्यक्तीचाच स्वार्थ साधला जात असेल तर ती संघटना टिकत नाही म्हणूनच संघटनेतील घटनेत मुळात चांगले विचार हवेत. संघटनेचे काम हे लोकांच्या उपयोगाचे हवे. ते टिकाऊ व दूरदर्शी देखील हवे. जे ताबडतोब लगेचच मिळते ते दीर्घ काळ टिकत नाही. संघटनेचं काम हे सांगता आलं पाहिजे त्यासाठी सोप्या भाषेत स्लोगन लागतात.
आवर्तनीयता ही संघटनेची सहावी अट आहे. आवर्त म्हणजे वादळ आणि आवर्त म्हणजे श्री.प्रकाश चुनारकर होय. संघटनेत वर्तनीयता हवी. वर्तनाला आदर्शाची गरज असते. त्यांच्या नेतृत्वाची तपनीयता अनुयायांना प्रेरित करते. संघटनेचे काम हे सर्वांचे सर्वांसाठी हवे तसेच ते निश्‍चित व नेमकं देखील हवे. संघटनेला काय पाहिजे, काय घडवून आणायचे आहे, याबद्दल संदेह नको. अशी तत्त्वाधारित संघटना उभी करण्यासाठी तत्त्वनिष्ठ कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत . जेव्हा वैयक्तिक लाभाच्या आणि मानापमानांच्या पलीकडे जाऊन समाज हिताच्या भूमिकेतून कार्य होते तेव्हा संघटना समाजाला पूरक ठरते. अशा निःस्वार्थ सेवेने भारलेल्या कार्यकर्त्यांची गुंफण असणारी संघटना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद विकासाचे भरीव कार्य करित आहे. स्वार्थाने कार्य बिघडते आणि निःस्वार्थाने सुधारते हे सूत्रमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद संघटनेचा मूलाधार आहे. अशा संघटनांची राष्ट्राला खरीगरज आहे.
Read More...