उद्दिष्टे

संघटनेचे नाव "महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद "

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद संघटनेचे मुख्य कार्यालय चंद्रपुर .
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रापुरते मर्यादित राहील.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदचे कामकाजाचे वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे राहील.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद ध्येय व उदिष्टे :-


    १] शिक्षण हे मानवी जीवन समृद्धीचे व समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, ते अधिक गतिमान व्हावे यासाठी .
        अ) भारतीय घटनेतील लोकशाही व सामाजिक मूल्यांचा, राष्ट्रीय एकात्मतेचा व शैक्षणिक उदिष्टांचा, घटक-संस्थांच्या उपक्रमाद्वारे व अध्यापनाद्वारे पाठपुरावा करणे.
        ब) शिक्षण हा या परिवर्तनाचा मुख्य घटक आहे. हे लक्षात घेऊन शिक्षणाला आपला महत्वाचा सहकारी मानून त्यांच्या व शिक्षण संस्था यांच्यात सहकार्य वाढविणे.
        क) शिक्षणाचा केंद्रबिंदू "विध्यार्थी" असल्याने सर्वांगिण विकासासाठी पालक, शिक्षक, संचालक व शासन यांच्या उपक्रमात सुसंवाद साधणे.
    २] महामंडळाच्या प्रत्येक घटना संस्थेची गुणवत्ता सातत्याने वाढीस लावणे व परस्पर सहकार्याने शिक्षणाचा विकास करणे.
    ३] शिक्षण संस्था सांस्कृतिक विकासाची व सामाजिक परिवर्तनाची केंद्रे होण्याच्या दृष्टीन आवश्यक असलेले उपक्रमशीलता व शैक्षणिक स्वायत्तता जपणे व वृद्धिंगत करणे व त्यात येणाऱ्या अडचणींचे निवारण करणे.
    ४] विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदू असल्याने त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षक, पालक, संस्थाचालक व शासन या शिक्षणातील सर्व घटकांचे सहकार्य मिळविण्याकरिता पालक संमेलने , शैक्षणिक प्रदर्शने व मेळावे इत्यादी आयोजित करणे , शैक्षणिक माहितीपत्रके , पुस्तके व नियतकालिके प्रसिध्द करणे.
    ५] शिक्षणाबद्दलच्या वरील निष्ठा व उद्दिष्टे स्वीकारलेल्या शिक्षकांच्या विद्या समित्या प्रत्येक घटक संस्थांतर्गत स्थापन करणे, शाळा , महाविद्यालये व शाळा समूह या संकल्पानाचा विस्तार करून त्यांना उद्युक्त करणे .
    ६] शैक्षणिक संस्थांनी आपल्या कार्याचा विस्तार करीत असतांना व्यावसायिक , तांत्रिक , वैज्ञानिक व उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांना अग्रक्रम देणे .
    ७] महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांच्या न्याय-हक्कांचे संरक्षण करणे , शैक्षणिक क्षेत्रातील शासकीय व इतर स्तरांवर प्रतिनिधित्व करणे , शैक्षणिक क्षेत्रातील विकासाला आवश्यक सवलती मिळवून देण्यास घटक संस्थांना मार्गदर्शन करणे व सहाय्यभूत होणे .
    ८] समाजाच्या आशा आकांक्षा लक्षात घेऊन वेळोवेळी शासनासमोर व समाजासमोर आपला शैक्षणिक दृष्टीकोन व कार्यक्रम मांडणे .